Monday, August 23, 2010

एक दिवस निसर्गासाठी @ कोरीगड


किल्ले आणि निसर्ग आणि कार्यरत असलेल्या स्वस्तिश्री हॉबीज संस्थेद्वारे दि. २२ ऑगस्ट २०१० रोजी किल्ले कोरीगड येथे 'एक दिवस निसर्गासाठी' उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या विषयी सकाळ मध्ये दि. २१ ऑगस्ट रोजी "काही निवडक काही सुखद" विशेष सदर मध्ये बातमी प्रसिद्द झाली होती, ज्याला किल्ले आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रतिसाद दिला.
कोरीगड किल्ला व परिसरात मोठ्या प्रमाणात वनातील वृक्षतोड करुन त्या डोंगर उतारावर नाचणीचे पीक घेण्यात येत आहे. यामुळे वनसंपत्ति धोक्यात आली आहे. येथील निसर्ग पुन्हा बहरावा म्हणुन स्वस्तिश्री हॉबीज द्वारा 'एक दिवस निसर्गासाठी' उपक्रम किल्ले कोरीगड येथे आयोजित करण्यात आला होता. यात बेल, कवठ, आवळा, पिंपळ, आंबा, उंबर, बेहडा, पुत्रंजीव, कांचन, पळस, करंज, बुच, काटेसावर, सीताअशोक, रतनगुंज, बहावा, रिठा असा १७ प्रकारच्या एकुण १०१ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत "निसर्गाला मानून गुरु चला वृक्षारोपण करु" हा ध्यास मनी ठेऊन वैदिक मंत्रोच्चारासह वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात गृहिणी, शिक्षिका, महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरी, व्यवसाय करणारे तरुणांसह वय वर्षे ७०चे सुधीर ताम्हाणे यांनीही अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. सहभागी झालेले किल्ले व निसर्गप्रेमी - स्नेहा कुलकर्णी, मनिषा वाघेला, हेमा लेले, संदीप सोनवणे, भारत मांडे, मनीषा नायडू, श्री पाटिल, संपन पाटिल, दुर्गा डम्बाले, एड. विंदा राउत, रुशिकेश मचाले, रविराज फुगे, सगळ्यात ज्येष्ठ सहभागीं श्री. ताम्हाणे यांनी सुद्दा तरुणांच्या खांद्याला खाद्यांला लावून स्वतः खड्डे खणून वृक्षारोपण केले. येथील गावातल्या लोकांनीही सहकार्य केले. वृक्षारोपणाची सुरुवात सर्व सहभागी तरुणी व महिलांच्या हस्ते करण्यात आली. रोपण करताना देशी वृक्षांचे निसर्गात, धार्मिक, आयर्वेदीक महत्व, पक्षी व वृक्षांचा असलेला परस्परावलंबी संबंध या बाबत, तसेच किल्ल्यावर दिसणार्‍या पक्षींबद्दल उमेश वाघेला यांनी माहिती दिली.

किल्ले कोरीगड़ची समुद्र सपाटी पासून ऊँची ९२९ मीटर आहे. पुरंदरच्या तहाच्या वेळी शिवाजी महाराजांनी जे बार किल्ले स्वतः कड़े ठेवले त्यात कोरिगड़चा ही समावेश होता. यावरून या किल्ल्याचे लश्करी दृष्टया आपण महत्व समजू शकतो. याच्या एका बाजुला कोकण आणि दुसर्या बाजुला देश असा प्रदेश दिसतो. गिर्यारोहक व प्रस्तरारोहक रघुराज एरंडे यांनी किल्ले कोरीगडचा इतिहास व किल्ल्या विषयी असी विस्तृत माहीती दिली.

विशेष उल्लेखनीय सकाळची मिळालेली साथ: कोरीगडला जाणारा रस्ता भुशी डॅमच्या इथुन जातो. या भागात मद्यधुंदांना आळा घालण्यासाठी दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांना आत्ता शनिवार-रविवार बंदी करण्यात आली आहे. हे तिथे पोचल्यावर कळले. आम्हाला लोनावळेतच ट्रॅफिक पोलिसांनी अडवले, पुढे जाण्यास बंदी घातली. त्यांना आम्ही कोरीगडला चाललो आहे, भुशी डॅमला नाही तरी ते सोडायला तयार नव्हते. त्यांना स्वस्तिश्री हॉबीज संस्थेविषयी माहिती दिली, वृक्षारोपणचा हेतुने चाललो आहे, आणि सकाळने आदल्या दिवशीच(शनिवार २१ ऑगस्ट) दिलेली बातमी त्यांना दाखवल्यावर त्यांनी लगेचच आम्हाला सोडले. काही अंतर पुढे गेल्यावर अजुन एक ट्रॅफिक चौकीवर आम्हाला अडवण्यात आले. परत त्यांना सर्व माहिती सकाळ मधे प्रसिद्द झालेली बातमी दाखवल्यावर 'चांगल्या कामाला आम्ही अडवत नाही' असे म्हणत पोलिसांनी पुढे जाऊ दिले. सकाळचे ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे आणि सकाळचे आभार मानावे तेवढे कमीच!


या कार्यक्रमाचे आणखी फोटो पाहण्यासाठी http://picasaweb.google.com/swastishreehobbies/OneDayForNatureKorigad#