Swastishree
स्वस्तिश्री ही संस्था निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहे. जनजागृती, शिक्षण व प्रत्यक्ष संवर्धनाद्वारे निसर्ग संवर्धन करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची झलक या ब्लॉगच्या माध्यमातून आपणास करून देत आहोत.
Thursday, March 1, 2012
माझं आभाळ: श्याना कव्वा
Thursday, March 24, 2011
संजीवनी - देउनी रोपांना पाणी नवचैतन्य आणू जीवनी @ मल्हारगड
गेल्या पावसाळ्या दरम्यान 'स्वस्तिश्री होबीज' द्वारा 'एक दिवस निसर्गासाठी' हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्या अंतर्गत किल्ले पुरंदर(४ जुलै २०१०), मल्हारगड(२५ जुलै २०१०), कोरीगड(२२ ऑगस्ट २०१०) आणि फुलगाव (२२ सप्टेंबर २०१०) येथे देशी वृक्षांचेच रोपण करण्यात आले आहे. लावलेल्या झाडांपैकी वड, पिंपळ, जांभुळ, कडुलिंब, उंबर, शिसू असी अनेक रोपं त्या जमिनीत रुजली आहेत व जगली आहेत. ह्या रोपांचे मोठे वृक्ष होवोत यासाठी या उन्हाळ्यात संस्थे द्वारा 'संजीवनी- देऊनी रोपांना पाणी नवचैतन्य आणू जीवनी' हा उपक्रम शनिवारी दि.१२ फेब्रुवारी २०११ रोजी मल्हारगडावर राबवण्यात आला.
या उपक्रमात लावलेल्या रोपांना ठिबक सिंचन द्वारे पाणी देण्यात आले. रोपांजवळची माती खुरपुन घेण्यात आली. या साठी पाणी व शीतपेयाच्या अनेक बाटल्या एकत्र करुन त्यात दोन दिवस पाणी भरुन ठेवल्या नंतर मल्हारगडावर लावलेल्या झाडांना देण्यात आले. कारण झाडांना शिळे पाणीच लागते, क्लोरीनयुक्त पाणी झाडांना धोकादायका असते. पाणी व शीतपेयाच्या बाटल्या कचर्यात किंवा इतरत्र फेकुन पर्यावरणाल नुकसान पोचवण्यापेक्षा त्याचा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ही असा उपयोग करता येऊ शकतो. प्रत्येक बाटलीला एक छोटे छिद्र पाडून त्याला सुतळी व दगडाने बांधून ठेवण्यात आले आहे. जेणेकरुन ते पाणी संपल्यावर इतरत्र उडून जाणार नाही. तसेच पुन्हा ते झाडांना पाणी देण्यासाठी वापरता येईल.
या उपक्रमाला स्वस्तिश्री हॉबीजचे उमेश वाघेला, चैतन्य राजर्षी, रघुराज एरंडे आणि संदीपान नलावडे उपस्थित होते.स्वस्तिश्री होबीज संस्थे द्वारा हौशी ट्रेकर्सना या द्वारे आवाहन करण्यात येते की त्यांना मल्हारगडावर या उन्हाळ्यात ह्या पाणीच्या बाटल्या दिसल्यास रोपांना आवर्जून पाणी घालावे. तसेच पाणी व शीतपेयाच्या बाटल्या इतरत्र फेकुन न देता असा प्रकारे उपयोग केल्यास पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागेल. संस्थे द्वारा 'संजीवनी- देऊनी रोपांना पाणी नवचैतन्य आणू जीवनी' हा उपक्रम कोरीगड, पुरंदर येथे ही राबवण्यात येणार आहे.

उपक्रमाचे अधिक फोटो पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://picasaweb.google.com/109246356674883585234/SanjivaniMalhargad#
Nest Box पक्ष्यांचे हक्काचे घर
वृक्ष हे पक्ष्यांचे व अनेक सजीवांचे आश्रय स्थान आहे. विणीच्या काळात झाडांच्या ढोलीत किंवा फांदीवर आपले घरटे बांधून पक्षी आपल्या पिल्लांना वाढवतात. परंतु वाढते शहरीकरण व रस्ता रुंदीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ह्याची मोठी झळ बसते ती पक्ष्यांना. वृक्षारोपणात विदेशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु पक्षी या विदेशी झाडांवर घरटी करत नाहीत. ही आपली झाडे नाहीत हे त्यांना चांगलेच समजते. जितक्या गतीने झाडे कापली जातात तितक्या गतिने तर नवीन लावलेली देशी झाडे वाढू शकत नाही. याचा सरळ परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर होतो. पक्षी हे निसर्गचक्राचे मुख्य घटक आहेत. अनेक झाडांचे परागीवहन, बीजप्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच मनुष्य जातीला तसेच शेतीला हानिकारक असलेले अनेक कीटकांना खाउन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. निसर्गाचे संतुलन करणार्या या निराधार झालेल्या पक्ष्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून स्वस्तिश्री हॉबीज संस्थे द्वारा 'नेस्ट बॉक्स- पक्ष्यांचे हक्काचे घर' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या साठी नैसर्गिक घरट्यातले वातावरण कृत्रिम घरट्यात सुद्धा कायम राहावे म्हणून लाकडी पेट्या बनवल्या आहेत.
पक्ष्यांचा आणि त्यांच्या घरट्यांचा शास्त्रोक्त अभ्यास करुन हे नेस्टबॉक्स बनवण्यात आले आहे. लोखंडी पतरा पेक्षा लाकडी पेट्या हे पर्यावरण पुरक आहेत. आपल्या घराच्या आवारात, कार्यालय, कारखाने, बागेत व इतर ठिकाणी ही घरटी लावल्यास ह्या पक्ष्यांना हक्काचे घर मिळेल व निसर्ग संवर्धनाला हातभार ही लागेल. ह्या घरट्यात साळुंकी, तांबट, चिमण्या, ब्राह्मणी मैना व अन्य पक्षी स्वीकार करु शकतात. घरटे लावल्या नंतर जे ते पक्षी त्यांना घरट्याची सुरक्षिततेची व दुसरे कोणीही वापरत नसल्याची खात्री पटल्यावर विणीच्या काळात ही घरटी स्वीकारतात. या घरट्यांना वरुन दाराची सोय केली आहे. एका पक्ष्यांची विण यात पूर्ण झाल्यावर ते साफ करुन पुन्हा जमिनी पासून मांजर-कुत्र्यांपासून सुरक्षित उंचीवर ठेवल्यास दुसरे पक्षी विणीत उपयोगात आणू शकतात. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत स्वस्तिश्री हॉबीज संस्थेत ही घरटी ना नफा ना तोटा या तत्त्वावर नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला ९८८११९१५४१ किंवा २७६५५७०७.Monday, March 14, 2011
फुलगावातील सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांचा 'एक दिवस निसर्गासाठी...'

वन्यजीव प्रकाशचित्रकार आणि निसर्ग अभ्यासक विश्वनाथ भागवत यांनी आपल्या पर्यंत पाणी कसे पोचते, पाणीचे पूर्ण ऋतुचक्र समजावले. ते पुढे म्हणाले पाणीचा अपव्यय टाळून सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनः वापरल्यास योग्य जल नियोजन होईल. वने नष्ट होत चालल्यामुळे दर वर्षी पाउस लांबत चालला आहे. हा चिंतेचा विषय आहे, पण चिंता व्यक्त करत राहण्यापेक्षा असा उपक्रमाद्वारे संवर्धनाला हातभार लावणे अत्यंत आवश्यक आहे.
ह्या उपक्रमाला विशेष उपस्थित ज्येष्ठ इतिहास संशोधक व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी छ्त्रपति शिवाजी महाराज निसर्गाचे महत्त्व चांगलेच ओळखून होते असी माहिती दिली.
शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर-दर्यांचा योग्य प्रकारे अभ्यास करून, समजुन-भटकुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली होती. प्रतापगडचे घनदाट जंगलाचा अतिशय योग्य उपयोग करुन स्वराज्यावर चालून आलेल्या अफ़झल खानाला संपविले. शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात स्पष्ट म्हटले आहे की फणस, आंबा असी विशिष्ट झाडे कदापी तोडू नये, कारण ती रयतेने मोठ्या प्रेमाने आपल्या लेकरांसाठी वाढविली आहेत. ती तोडून रयतेची हाय घेऊ नये. आरमारसाठी लाकूड लागत असल्यास परमुलखातून आणावीत. आपल्या राज्यातही उपयोगी असी आंबा, फणस, सागवान व विविध प्रकारची वृक्षांची लागवड करावी. 
'एक दिवस निसर्गासाठी' ची सुरुवात ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रमोद मांडे याच्या हस्ते कडुलिंबाचे रोपणाद्वारे वैदिक मंत्रोच्चारासह करण्यात आली. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा वृक्षारोपण करताना उत्साह ओसंडून वाहत होता. तीन विद्यार्थ्यांनी मिळुन एक वृक्ष वैदिक मंत्रोच्चारासह रोपण केले. ह्या विद्यार्थ्यांनी जो पर्यंत शाळेत आहोत तो पर्यंत या झाडांना पाणी देण्याची व संरक्षण, संगोपनाची हमी दिली आहे. कडुलिंब, पुत्रंजीव, कांचन, बुच, बहावा, भेंडी, बेहडा, जांभुळ, अर्जुन, फणस, औदुंबर, आंबा, शिसवी(शिसम), आवळा अश्या विविध प्रकारच्या ७६ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. देशी वृक्षांचे रोपण का करावे व त्याचे पर्यावरणातले, आयर्वेदातले महत्व असी विविध माहीती उमेश वाघेला यांनी दिली. स्वस्तिश्री हॉबीज द्वारा 'एक दिवस निसर्गासाठी' उपक्रमाचा ह्या पावसाळ्याचा हा समारोपाचा कार्यक्रम होता. या उपक्रमाला श्री. राजकुमार ढमाले यांनी विशेष सहकार्य केले. या वर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेऊन अभ्यास करुन घेऊन पुढ्च्या वर्षीचे उपक्रम ठरवण्यात येणार आहे. पुढील पावसाळ्यात निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा या हेतूने अधिक व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे अधिक फोटो पहाण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://picasaweb.google.com/109246356674883585234/200StudentsGaveOneDayForNature#
Friday, February 25, 2011
आयुकाच्या शास्त्रज्ञांनी दिला 'एक दिवस निसर्गासाठी'
१५ ऑगस्ट २०१० च्या स्वातंत्र्य दिनी आंतरविद्यापीठीय केंद्र: खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी(आयुका) द्वारा गिरवली डोंगर व परिसरात देशी वृक्षारोपण करण्यात आले.
गिरवली येथे भारतातील सर्वात मोठी दुसरी खगोलीय दुर्बीण आहे. येथे खगोलशास्त्र व खगोलभौतीक शास्त्रावर संशोधन करण्यात येते.
आयुकाच्या गिरवली वेधशाळेचे संचालक डॉ. विजय मोहन यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारासह पिंपळच्या रोपाचे रोपणाद्वारे सुरुवात करण्यात आली. तर डॉ. रंजन गुप्ता यांनी बेल वृक्षाचे रोपण केले. या कार्यक्रमात आयुकाच्या शास्त्रज्ञांसमवेत आंमत्रितांनीही अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. उपक्रमात जीतेंद्र जोशी, निलेश पोखरकर, दिलीप पाचारणे, संभाजी व मनिषा कर्जुले, ह्रितिक, दिपा मोदी, गगन पुरोहित, श्री व सौ भणसाली, अमित ताम्रकर, जगन बोर्हाडे, भरत गव्हाणे, रामू पांडे व सहकारी कर्मचारी सहभागी झाले होते. घोडेगाव वनविभागाचे श्री. मोहन जोशी व कर्मचार्यांनी विशेष सहकार्य केले. 
या उपक्रमात पिंपळ, वड, बेल, उंबर, चिंच, आंबा, आवळा, हिरडा, शिसू, बांबू, गुंज, कांचन, असा विविध देशी वृक्षांची रोपं लावण्यात आली. वनविभागाच्या हद्दीत डोंगर उतारावर हे वृक्षारोपण करण्यात आले.
यातील वड, पिंपळ, उंबर यांना 'कलीची संसाधने' असेही म्हणतात. कारण जेंव्हा इतर झाडांना फळं नसतात तेंव्हाही झाडे फळांनी लगडलेली असतात. या वर अनेक कीटक, पक्षी, खारी सारखे सस्तन प्राणी तग धरुन असतात. तरअन्य झाडे स्थानिकांना उपयोगी पडणारी आहेत. उपस्थितांना झाडांचे निसर्गातील महत्व, प्राणी व पक्षींचा वृक्षांचापरस्पर संबंध या बाबत आयुकाचे चैतन्य राजर्षी यांनी माहिती दिली. निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला यांनी वैदिकमंत्र म्हटला व वृक्षांचे आयर्वेदीक तसेच पुराणातील महत्व सांगितले.

