Thursday, March 24, 2011

संजीवनी - देउनी रोपांना पाणी नवचैतन्य आणू जीवनी @ मल्हारगड

गेल्या पावसाळ्या दरम्यान 'स्वस्तिश्री होबीज' द्वारा 'एक दिवस निसर्गासाठी' हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्या अंतर्गत किल्ले पुरंदर(४ जुलै २०१०), मल्हारगड(२५ जुलै २०१०), कोरीगड(२२ ऑगस्ट २०१०) आणि फुलगाव (२२ सप्टेंबर २०१०) येथे देशी वृक्षांचेच रोपण करण्यात आले आहे. लावलेल्या झाडांपैकी वड, पिंपळ, जांभुळ, कडुलिंब, उंबर, शिसू असी अनेक रोपं त्या जमिनीत रुजली आहेत व जगली आहेत. ह्या रोपांचे मोठे वृक्ष होवोत यासाठी या उन्हाळ्यात संस्थे द्वारा 'संजीवनी- देऊनी रोपांना पाणी नवचैतन्य आणू जीवनी' हा उपक्रम शनिवारी दि.१२ फेब्रुवारी २०११ रोजी मल्हारगडावर राबवण्यात आला.
या उपक्रमात लावलेल्या रोपांना ठिबक सिंचन द्वारे पाणी देण्यात आले. रोपांजवची माती खुरपुन घेण्यात आली. या साठी पाणी व शीतपेयाच्या अनेक बाटल्या एकत्र करुन त्यात दोन दिवस पाणी भरुन ठेवल्या नंतर मल्हारगडावर लावलेल्या झाडांना देण्यात आले. कारण झाडांना शिळे पाणीच लागते, क्लोरीनयुक्त पाणी झाडांना धोकादायका असते. पाणी व शीतपेयाच्या बाटल्या कचर्‍यात किंवा इतरत्र फेकुन पर्यावरणाल नुकसान पोचवण्यापेक्षा त्याचा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ही असा उपयोग करता येऊ शकतो. प्रत्येक बाटलीला एक छोटे छिद्र पाडून त्याला सुतळी व दगडाने बांधून ठेवण्यात आले आहे. जेणेकरुन ते पाणी संपल्यावर इतरत्र उडून जाणार नाही. तसेच पुन्हा ते झाडांना पाणी देण्यासाठी वापरता येईल.
या उपक्रमाला स्वस्तिश्री हॉबीजचे उमेश वाघेला, चैतन्य राजर्षी, रघुराज एरंडे आणि संदीपान नलावडे उपस्थित होते.
स्वस्तिश्री होबीज संस्थे द्वारा हौशी ट्रेकर्सना या द्वारे आवाहन करण्यात येते की त्यांना मल्हारगडावर या उन्हाळ्यात ह्या पाणीच्या बाटल्या दिसल्यास रोपांना आवर्जून पाणी घालावे. तसेच पाणी व शीतपेयाच्या बाटल्या इतरत्र फेकुन न देता असा प्रकारे उपयोग केल्यास पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागेल. संस्थे द्वारा 'संजीवनी- देऊनी रोपांना पाणी नवचैतन्य आणू जीवनी' हा उपक्रम कोरीगड, पुरंदर येथे ही राबवण्यात येणार आहे.

उपक्रमाचे अधिक फोटो पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://picasaweb.google.com/109246356674883585234/SanjivaniMalhargad#


No comments:

Post a Comment