Friday, February 25, 2011

आयुकाच्या शास्त्रज्ञांनी दिला 'एक दिवस निसर्गासाठी'

१५ ऑगस्ट २०१० च्या स्वातंत्र्य दिनी आंतरविद्यापीठीय केंद्र: खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी(आयुका) द्वारा गिरवली डोंगर परिसरात देशी वृक्षारोपण करण्यात आले.
गिरवली येथे भारतातील सर्वात मोठी दुसरी खगोलीय दुर्बीण आहे. येथे खगोलशास्त्र खगोलभौतीक शास्त्रावर संशोधन करण्यात येते.

आयुकाच्या गिरवली वेधशाळेचे संचालक डॉ. विजय मोहन यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारासह पिंपळच्या रोपाचे रोपणाद्वारे सुरुवात करण्यात आली. तर डॉ. रंजन गुप्ता यांनी बेल वृक्षाचे रोपण केले. या कार्यक्रमात आयुकाच्या शास्त्रज्ञांसमवेत आंमत्रितांनीही अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. उपक्रमात जीतेंद्र जोशी, निलेश पोखरकर, दिलीप पाचारणे, संभाजी मनिषा कर्जुले, ह्रितिक, दिपा मोदी, गगन पुरोहित, श्री सौ भणसाली, अमित ताम्रकर, जगन बोर्हाडे, भरत गव्हाणे, रामू पांडे सहकारी कर्मचारी सहभागी झाले होते. घोडेगाव वनविभागाचे श्री. मोहन जोशी कर्मचार्यांनी विशेष सहकार्य केले.

या उपक्रमात पिंपळ, वड, बेल, उंबर, चिंच, आंबा, आवळा, हिरडा, शिसू, बांबू, गुंज, कांचन, असा विविध देशी वृक्षांची रोपं लावण्यात आली. वनविभागाच्या हद्दीत डोंगर उतारावर हे वृक्षारोपण करण्यात आले.


यातील वड, पिंपळ, उंबर यांना 'कलीची संसाधने' असेही म्हणतात. कारण जेंव्हा इतर झाडांना फळं नसतात तेंव्हाही झाडे फळांनी लगडलेली असतात. या वर अनेक कीटक, पक्षी, खारी सारखे सस्तन प्राणी तग धरुन असतात. तरअन्य झाडे स्थानिकांना उपयोगी पडणारी आहेत. उपस्थितांना झाडांचे निसर्गातील महत्व, प्राणी पक्षींचा वृक्षांचापरस्पर संबंध या बाबत आयुकाचे चैतन्य राजर्षी यांनी माहिती दिली. निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला यांनी वैदिकमंत्र म्हटला वृक्षांचे आयर्वेदीक तसेच पुराणातील महत्व सांगितले.

https://picasaweb.google.com/109246356674883585234/IUCAASScinetistGave1Day4Nature#