Nest Box पक्ष्यांचे हक्काचे घर
वृक्ष हे पक्ष्यांचे व अनेक सजीवांचे आश्रय स्थान आहे. विणीच्या काळात झाडांच्या ढोलीत किंवा फांदीवर आपले घरटे बांधून पक्षी आपल्या पिल्लांना वाढवतात. परंतु वाढते शहरीकरण व रस्ता रुंदीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ह्याची मोठी झळ बसते ती पक्ष्यांना. वृक्षारोपणात विदेशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु पक्षी या विदेशी झाडांवर घरटी करत नाहीत. ही आपली झाडे नाहीत हे त्यांना चांगलेच समजते. जितक्या गतीने झाडे कापली जातात तितक्या गतिने तर नवीन लावलेली देशी झाडे वाढू शकत नाही. याचा सरळ परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर होतो. पक्षी हे निसर्गचक्राचे मुख्य घटक आहेत. अनेक झाडांचे परागीवहन, बीजप्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच मनुष्य जातीला तसेच शेतीला हानिकारक असलेले अनेक कीटकांना खाउन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. निसर्गाचे संतुलन करणार्या या निराधार झालेल्या पक्ष्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून स्वस्तिश्री हॉबीज संस्थे द्वारा 'नेस्ट बॉक्स- पक्ष्यांचे हक्काचे घर' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या साठी नैसर्गिक घरट्यातले वातावरण कृत्रिम घरट्यात सुद्धा कायम राहावे म्हणून लाकडी पेट्या बनवल्या आहेत.
पक्ष्यांचा आणि त्यांच्या घरट्यांचा शास्त्रोक्त अभ्यास करुन हे नेस्टबॉक्स बनवण्यात आले आहे. लोखंडी पतरा पेक्षा लाकडी पेट्या हे पर्यावरण पुरक आहेत. आपल्या घराच्या आवारात, कार्यालय, कारखाने, बागेत व इतर ठिकाणी ही घरटी लावल्यास ह्या पक्ष्यांना हक्काचे घर मिळेल व निसर्ग संवर्धनाला हातभार ही लागेल. ह्या घरट्यात साळुंकी, तांबट, चिमण्या, ब्राह्मणी मैना व अन्य पक्षी स्वीकार करु शकतात. घरटे लावल्या नंतर जे ते पक्षी त्यांना घरट्याची सुरक्षिततेची व दुसरे कोणीही वापरत नसल्याची खात्री पटल्यावर विणीच्या काळात ही घरटी स्वीकारतात. या घरट्यांना वरुन दाराची सोय केली आहे. एका पक्ष्यांची विण यात पूर्ण झाल्यावर ते साफ करुन पुन्हा जमिनी पासून मांजर-कुत्र्यांपासून सुरक्षित उंचीवर ठेवल्यास दुसरे पक्षी विणीत उपयोगात आणू शकतात. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत स्वस्तिश्री हॉबीज संस्थेत ही घरटी ना नफा ना तोटा या तत्त्वावर नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला ९८८११९१५४१ किंवा २७६५५७०७.
No comments:
Post a Comment