
सोनोरी किल्ल्याच्या परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. इथला निसर्ग बहरावा म्हणून रविवारी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी दि. २५ जुलै २०१० रोजी "एक दिवस निसर्गासाठी" हा उपक्रम किल्ले सोनोरी (मल्हारगड़) येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत "निसर्गाला मानुन गुरु चला वृक्षारोपण करु" हा ध्यास मनी ठेऊन वैदिक मंत्रोच्चारासह वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षिका, शेती, नोकरी-व्यवसाय करणारे तरुण-तरूणी आणि अनेक आयटी इंजिनीयर सहभागी झालेले किल्ले व निसर्गप्रेमी - स्नेहा कुलकर्णी, अरूंधती मरकळे, रुपाली जोशी, मनिषा वाघेला, हेमा लेले, संदीप सोनवणे, भारत मांडे, आकाश माने, कल्पेश मारलेचा, अमित चौलवार, गणेश बांगर, विवेक इगवे, लक्ष्मीकांत गोपुलवाड, गणेश जाधवर, अंकुश राठोड, महेश खराडे, रोहित मोहिते, अनिकेत पाटणकर, रविराज फुगे, ऋषिकेश मचाले, आणि छोट्या सहा वर्षाच्या सिद्धेश रोकले पासुन ते ९७ वर्षांच्या लक्ष्मण गणेश दिनकर यांनीही अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.
यात उंबर, पिंपळ, वड, कडुलिंब, पळस, बेल, जांभुळ, आवळा, करंज, बहावा, सिताफळ, चिंच, कांचन, बांबू, परसपिंपळ(भेंडी), लिंबू, शिसू, पेरु, आंबा असा १९ प्रकारच्या एकुण १२७ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.
देशी वृक्षाचे निसर्गात तसेच धार्मिक व औषधी महत्त्व, रोपण करण्यात येणार्या प्रत्यके झाडांचे वैशिष्ट्य, पक्षी व वृक्षांचा असलेला परस्परावलंबी संबध याबाबत निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला यांनी माहिती दिली. या किल्ल्यावर तुर्रेबाज गरुड(Crested Serpant Eagle), कापशी घार(Black Shouldered Kite), ससाणा(kestrel), व इतर शिकारी पक्षी दिसतातच तसेच पायथ्या पासून ते वर पर्यंत अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. यात तितर(Rock Bush Quail), युवराज(Crested Bunting), तितर, सुभग(Common Iora), चंडोल(Lark), वेडा राघू(Green Bee Eater), लाजरी कोंबडी(White Breated Water Hen), सुगरण(weaver Bird), चन्ना पोपट इतरचा समावेश आहे.
सोनोरी (मल्हारगड) किल्ला स्वराज्यात बांधण्यात आलेला अंतिम किल्ला, म्हणून याला धाकटा किल्ला असे पण म्हणतात. पेशव्यांचे तोफखान्याचे सरदार भिवराव पानसे यांनी हा किल्ला १७९९ साली बांधला, अशी माहिती गिर्यारोहक निलेश गावडे यांनी दिली. किल्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या 'सोनोरी स्वच्छ्ता मोहिम' बद्दल माहिती दिली.
निसर्ग अभ्यासक चैतन्य राजर्षी यांनी वृक्षारोपण कसे करावे, व झाल्यावर कोणताही अविघटनशील असा प्लॅस्टिक कचरा मागे सोडू नये, किल्ल्याच्या परिसरात किल्ल्याच्या बांधकामाला धोका पोचणार नाही असा सुरक्षित अंतरावर वृक्षारोपण करावे याबद्दल मार्गदर्शन केले व आभार मानले. याच बरोबर सासवड येथील संगमेश्वर मंदीरची अद्भुत वास्तुकला व शिल्पकारी, मंदिराचे वेग वेगळ्या भागांबद्दल उमेश वाघेला यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे आणखी फोटो पहाण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
http://picasaweb.google.com/swastishreehobbies/EkDiwasNisargasathiMalhargad#



HAT'S OFF to your this cause & wish you a very best of luck! Such dedication & nature protection approach will only help su for better & futuristic INDIA & WORLD. Talking about GROWTH etc. won't last unless we care for the NATURE & MOTHERLAND. Your contribution to this motherland is very valuable & it will teach others to PLANT TREES & to GROW TREES. Keep it up!
ReplyDeleteDhananjay Shedbale, Pune